Published On : Tue, Sep 8th, 2020

ठराविक वेळेत डॉक्टरांकडून करा समुपदेशन

Advertisement

मनपा-आयएमएचा पुढाकार : होम आयसोलेशनमधील रुग्णांनी लाभ घेण्याचे महापौरांचे आवाहन

नागपूर : लक्षणे नसलेल्या कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांना आता होम आयसोलेशनचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे. मात्र या काळात उपचाराविषयी अथवा प्रकृतीविषयी अनेक प्रश्न रुग्णांच्या मनात उपस्थित होतात. त्याची उत्तरे मिळण्यासाठी आणि समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका आणि आयएमएने पुढाकार घेऊन शहरातील नामांकित डॉक्टरांकडून समुपदेशनाची व्यवस्था केली आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर श्री.संदीप जोशी यांनी केले आहे.

विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिका आणि आयएमएने डॉक्टर समुपदेशनासाठी ज्या वेळेत उपलब्ध असतील त्या वेळेसह आणि त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकासह डॉक्टरांची यादीच जारी केली आहे. हे समुपदेशन पूर्णपणे नि:शुल्क राहील. डॉक्टरांचा वेळ अमूल्य असल्यामुळे दिलेल्या वेळेतच फोन करून लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

असे आहेत डॉक्टरांचे नाव आणि क्रमांक
समुपदेशनासाठी ज्या डॉक्टरांची नावे आयएमएने उपलब्ध करून दिली आहेत, ती यादी पुढीलप्रमाणे आहे. डॉ. कुंदा तायडे (मो.क्र. ९३७३१०६२०९, वेळ : सायं. ६ ते ८ पर्यंत), डॉ. मनमोहन राठी (मो.क्र.९८२२७२२५६९ वेळ : दुपारी ४ ते सायं. ७), डॉ. विजया बालपांडे (मो. क्र. ९३७३२८४६९९, वेळ : दुपारी ४ ते सायं. ७), डॉ. अन्नपूर्णा चौधरी (मो. क्र. ९८२३१२८२७७, वेळ : दुपारी २ ते ४), डॉ. मलानी (मो. क्र. ९७३००३१०३३, वेळ : दुपारी २ ते सायं. ६), डॉ. किशोर माने (मो. क्र. ९९२१६२८१८२, वेळ : दु. ३ ते ५), डॉ. अर्जुन भोजवानी (मो. क्र. ९३२६९८४३२१, वेळ : सकाळी १० ते दु. १), डॉ, विजया बालपांडे (मो. ९३७३२८४६९९, वेळ दु. ४ ते सायं. ७), डॉ. किशोर माने, नरखेड (मो. ९९२१६२८१८२, वेळ दुपारी ३ ते ५), डॉ. वंदना काटे (मो. ९८२२५६०४३१, वेळ : सायं. ७ ते ८), डॉ. वाय. एस. देशपांडे (मो. ९८२३०८३८४१,वेळ : सायं. ६ ते ८), डॉ. दिवाकर भोयर (मो. ९३७३१०५३७०, वेळ : सकाळी ९ ते दु. १ आणि सायं. ६ ते ९), डॉ. अर्चना देशपांडे (मो. ९८२२५७२१७१, वेळ : दु. १२ ते २), डॉ. सौरभ बरडे (मो. ९८२२६४१२२०, वेळ : सकाळी ८ ते रात्री १०).