Published On : Fri, Mar 23rd, 2018

भिडेंना अटक करा; राष्ट्रवादीच्या आमदारांनी झळकवले फलक


मुंबई: भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर जोरदार निदर्शने केली.

विशेष उल्लेखाच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानपरिषदेमध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्याला अटक करण्याची मागणी केली.

संभाजी भिडे यांना लवकरात लवकर अटक व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विशेष उल्लेखाची सूचना मांडली. त्यानंतर आमदार प्रकाश गजभिये, आमदार विद्या चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड, आमदार रामराव वडकुते आणि विरोधी पक्षाचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी ‘भिडेंना अटक करा’ अशा आशयाचे फलक सभागृहाबाहेर येवून झळकवले.