Published On : Tue, Apr 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गॅस टंचाईचा फटका; सिलेंडरसाठी दोन-दोन दिवसांची प्रतीक्षा

- सर्वसामान्य नागरिक त्रस्त
Advertisement

नागपूर : शहरात गॅस टंचाईचे संकट गडद होत असून नागरिकांना एलपीजी सिलेंडरसाठी अक्षरशः हेलपाटे मारावे लागत आहेत. नारी रोडवरील ‘संगीता गॅस एजन्सी’शी संबंधित वितरण व्यवस्थेमुळे नागरिकांचा संताप वाढत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीचे गोडाऊन उप्पलवाडी परिसरात असून ग्राहकांना आधी टोकन घ्यावे लागते. त्यानंतरही लगेच सिलेंडर मिळत नाही. अनेकांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच सिलेंडर दिला जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे रोजंदारी करणाऱ्या आणि कामानिमित्त व्यस्त असलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, एचपी गॅसच्या ग्राहकांना या विलंबाचा सर्वाधिक फटका बसत असून, वेळेवर गॅस मिळत नसल्याने घरगुती कामकाजावरही परिणाम होत आहे. काही नागरिकांनी तर सिलेंडर मिळवण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगितले.

दरम्यान, गॅस वितरणात पारदर्शकता नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. टोकन प्रणाली असूनही ठरलेल्या वेळेत गॅस मिळत नसल्याने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांनी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नियमित व वेळेवर गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात या प्रश्नावर तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.