Published On : Thu, Jun 11th, 2020

नेहरू ग्राउंड रामटेक येथील ग्रीन जिम परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

Advertisement

दररोज सकाळी व्यायाम करायला येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक

ग्रीन जीम परिसर कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून व वाढलेली झाडे झुडपे पासुन मुक्त करण्याची नागरिकांची मागणी.
संभाधित प्रशासना चे आरोग्य विषयी गंभीर बाबीवर दुर्लक्ष!

रामटेक -कोरोनाच्या काळात आता संपूर्ण देश संकटात आहे. संपूर्ण देशात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आपण कधी या संकटातून मुक्त होऊ अशी चर्चा नागरिक करत आहेत. अशातच आता अनलॉक मधेही आता प्रशासनाने काही सुविधासाठी परवानगी दिली आहे.

या कोरोना विषाणूंमुळे आता स्वतःला निरोगी ठेवणे आता खूप गरजेचे बनले आहे. रामटेक येथील नेहरू ग्राउंडवर दररोज सकाळी नागरिक व्यायाम करायला येतात. परंतु बाजूलाच असलेल्या ग्रीन जिमजवळ गंदगीचे साम्राज्य आहे.आजूबाजूला सर्वत्र कचऱ्याचा ढीग पसरलेला आहे.

झुडपे वाढलेली आहे , पावसाळयातही दररोज सकाळी नागरिक इथे येतात आणि पावसाळ्यात साप विंचू यांची पण खूप भीती असते. व्यायाम करणे शरीरासाठी चांगले आहे परंतू जर अशा परिसरात नागरिक व्यायाम करतील तर रोगराई ,आजार होईल. रामटेक शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. जर गंदगीचे साम्राज्य दिसेल तर शहर स्वच्छ आणि सुंदर आहे हे म्हण्याला नागरिकांना जरा विचारच करावं लागेल.

परंतु नेहरू ग्राउंडच्या परिसरातील ग्रीन जिमच्या भागाची अशी परिस्थिती पाहून नागरिक आता चिंतेत आहेत.पालिका प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी ही बाब मनावर घेऊन ज्या परिसरात आपल्या आरोग्याच्या हितासाठी मोकळ्या हवेशीर जागेत फिरायला आणि व्यायाम करायला येतात त्यांच्यासाठी हा परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त असणे आवश्यक आणि गरजेचेही आहे.

त्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी अशा प्रकारचे मत आमचे प्रतिनीधीशी बोलताना प्रकाश मस्के, शेषराव बांते, कैलाश कुरजेकर, विजय उडगीलवार , सुरेंद्र भोयर, , रुपराव चांदेकर, मनोहर हत्तीतले, अशोक गुरव, जितेंद्र चकोले, नितीन चींतलवाार, दिलीप मेहरकुळे, योगिता मस्के यांनी व्यक्त केले आहे..संभाधित प्रशासना चे आरोग्य विषयक गंभीर बाबिवर दूर्लक्ष कसे ?असा यक्ष प्रश्न जागरुक नागरिक करीत आहे.