Published On : Thu, Mar 14th, 2024

नागपुरात बोगस कागदपत्रे वापरून जमीन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांकडून मोक्का अंतर्गत करवाई !

Advertisement

नागपूर :भूमाफियांविरोधात कठोर पाऊले उचलत पोलिसांनी नागपुरात बोगस कागदपत्रांचा वापर करून जमीन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नागपूर पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासोबतच त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत करवाई सुरु केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निशा राजकुमार जाजू (६३, रा. नवजीवन कॉलनी, गजानन नगर, अजनी) हिला तिचा ३,००० चौरस फुटांचा भूखंड इमाम खान अब्दुल रहीम खान (३३) याला विकल्याचे तिच्या सीएने सांगितले. तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिने आपली कोणतीही जमीन विकली नव्हती.इमाम खान अब्दुल रहीम खान हा याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की काही बदमाशांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जाजूची जमीन खानला 5 लाख रुपयांना विकली.

तपासादरम्यान पोलिसांना आरोपीइमाम खान अब्दुल रहीम खानसह एकूण १८ जणांना अटक केली आहे.यातील पवनकुमार जांगेला (३४, रा. मनीष नगर) नारायण वर्मा (४०, रा. सिवनी, मध्य प्रदेश), उमरेड येथील रहिवासी असून प्रतिभा मेश्राम या महीलेने जमीन व्यवहार करताना स्वतःला जाजू म्हणून सांगितले होते.

दरम्यान सर्व आरोपींच्या अटकेनंतर नागपूर पोलिसांनी त्यांच्यावरही मोक्का लावला असून पुढील तपास सुरू केला आहे.