मुंबई : राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देताना वातावरण भक्तिमय आणि उत्साही होतं. मात्र, आनंदसोहळ्यात काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या असून वेगवेगळ्या अपघातांत १८ जणांचा बळी गेला आहे.
नाशिकमध्ये तिघांचा बळी
नाशिक जिल्ह्यात विसर्जनावेळी तिघांचा मृत्यू झाला.
- आनंदवल्ली येथे गोदावरी नदीत प्रवीण शांताराम चव्हाण वाहून गेला.
- बोरगड येथे चंदर नथू माळेकर (२९, रा. म्हसोबावाडी) बुडून मृत्यूमुखी पडला.
- सिन्नरजवळील सरदवाडी धरणात ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (४०) यांचा मृत्यू झाला.
धुळ्यात अपघात
शिरपूर तालुक्यातील तापी नदीत विसर्जन करून परतणारा शुभम सांगवी या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला.
मीरा भाईंदर आणि मुंबईतील घटना
मीरा भाईंदरमध्ये विसर्जन मिरवणुकीत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा थोडक्यात बचावला.
मुंबईतील साकीनाका भागातही मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
नांदेडमध्ये दोन बेपत्ता
गाडेगाव शिवारातील आसना नदीत तिघे भाविक वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं, मात्र दोघे अजूनही बेपत्ता आहेत.
इतर घटना
- शहापूर तालुक्यातील दुर्घटनेत तीघांचा मृत्यू झाला.
- अमरावती जिल्ह्यातही वेगवेगळ्या अपघातांत तीघांचा मृत्यू झाला.
या सर्व घटनांमुळे बाप्पाला निरोप देण्याच्या आनंदसोहळ्यावर शोककळा पसरली आहे. भाविकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.