Editor in Chief : S.N.Vinod    |    Executive Editor : Sunita Mudaliar
| |
Published On : Thu, Sep 13th, 2018

Ganesh Chaturthi 2018 : ‘आला आला माझा गणराज आला’, लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन

मुंबई: लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये ढोलताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालेले आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, या जयघोषात भक्तांनी आपल्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व फुललेल्या बाजारपेठा यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. लालबागच्या राजा, गणेश गल्लीचा राजा आणि सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या आहेत.

गणेशपूजनासाठी मध्यान्ह काळ योग्य
आजच्या गणेशपूजनासाठी मध्यान्ह काळ हा योग्य आहे. सकाळी 11 वाजून 21 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ आहे. परंतु, जर कोणाला या वेळेत शक्य नसेल तर त्यांनी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6.42 वाजेपर्यंत पूजन करण्यास हरकत नाही.

ज्येष्ठ गौरी अनुराधा नक्षत्रात येतात आणि ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. तर मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. या वर्षी शनिवारी 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस अनुराधा नक्षत्र आहे. रविवारी संपूर्ण दिवस ज्येष्ठा नक्षत्र आहे, त्यामुळे पूर्ण दिवस गौरी पूजनासाठी अनुकूल आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली.

Bebaak
Stay Updated : Download Our App