Published On : Tue, Oct 2nd, 2018

विडिओ: गांधी जयंतीनिमित्त नागपूर भाजपाची पदयात्रा; मुख्यमंत्र्यांनी घेतला सहभाग

Advertisement

NAGPUR: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, भाजपाने आजपासून राज्यात पदायात्रा मोहिम सुरु केली असून नागपूर येथील पादयात्रेत सकाळी भाजपा कार्यकर्त्यांसह मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने वातावरणनिर्मिती म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने मंगळवारपासून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्धा येथून मंगळवारी या पदयात्रेला झाली.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, नागपूरमधील पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले, भजनी मंडळींचे पारंपारिक वाद्य असलेले टाळ गळ्यात अडकवून मुख्यमंत्र्यांनी ही पदयात्रा केली. या यात्रेनिमित्त त्यांनी जनतेशी संवाद साधला. या पदयात्रेला भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

Advertisement
Advertisement