Published On : Thu, Oct 3rd, 2019

” स्वच्छता हीच सेवा ” च्या प्रबोधनाने गांधी व शास्त्री यांची जंयती साजरी

कन्हान : – ग्राम पंचायत वराडा व्दारे ” स्वच्छता हीच सेवा ” या ब्रिंदासह गावात भजनाच्या गर्जरात रैली काढुन टाकाऊ प्लास्टिक गोळा व नष्ट करून तंबाखु व वाईट व्यसनमुक्तीची शपथ घेत स्वच्छ, सुंदर वराडा गावाकरिता महाश्रमदान करून महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची सयुक्त जंयती थाटात साजरी करण्यात आली.

बुधवार (दि.२) ऑक्टोबर सकाळी ग्राम पंचायत वराडा व्दारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११४ वी जंयती सयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करून सरपंचा विद्याताई चिखले व उपसरपंच उषाताई हेटे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार व आदरांजली अर्पण करून ” स्वच्छता हीच सेवा ” या ब्रिदासह भजन मंडळा च्या भजनानी स्वच्छता,प्लास्टिक, तंबाखु व वाईट व्यसन मुक्तीचे प्रबोधन करित स्वच्छता रैली काढुन गावक-यां च्या महाश्रमदानाने गाव भ्रमण करित टाकाऊ प्लास्टिक कचरा गोळा करून नष्ट केल्यानंतर हात, पाय स्वच्छ धुवुन गाव स्वच्छतेच्या संकल्पासह तंबाखु व वाईट व्यसनमुक्तीची प्रतिञा घेण्यात आली.

वापरलेले सँनिरेटी पँड नष्ट करण्याचे इन्सीलेटर मशीनचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी गट विकास अधिकारी प्रदीप कुमार बम्हनोटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघ, जिल्हा समन्वयक आशिष राऊळे, विस्तार अधिकारी ना़ईक, स्वच्छता अभियान पं स पारशिवनीचे मुनेश दुपारे हयानी गावक-याना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंचा, उपसरपंचा, ग्राम सचिव, सर्व ग्राम पंचायत सदस्य, केंद्र प्रमुख अगस्ती मँडम, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, महिला बचत गट, आरोग्य व महिला बाल कल्याण कर्मचारी सह शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.