Published On : Sun, Sep 17th, 2023

नागपुरात गणपती बाप्पाचा थाट; आकर्षक गणेश मूर्तींनी सजली दुकाने !

नागपूर :गणपती बापाचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होत आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नागपुरातील बाजारपेठ सजली आहे. विविध आकाराच्या आणि आकर्षक रंगांच्या गणपतीच्या मूर्तींनी स्टॉल सजले आहेत. गणपतीच्या सजावटीच्या साहित्यांनीही दुकाने उजळून निघाली आहेत. यंदा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महानगरपालिका आणि पोलीस प्रशनाने दिले आहे. यानुसार यंदा बाजारपेठेत ईको फ्रेंडली गणपती विक्रीस आले आहेत.

सराफ बाजारामध्ये पंधराशे रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत गणपती मुर्तींसोबतच सजावटीसाठी विविध रंगाच्या माळा, हार, मुकुट, मखर, झुरमुळ्या, विद्युत दिवे, कृत्रिम फुलांचे तोरण आदी साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. गणपती उत्सवासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement