Published On : Sat, Sep 26th, 2020

Live Video : नागपूरमध्ये भरदिवसा पाठलाग करून ठार मारलं!

नागपूर :अमरावती मार्गावर कारचा पाठलाग करून भर सिग्नलवर चार ते पाच आरोपींनी कार चालकाची घातक शास्त्राची घालून हत्या केली. आज दुपारी ४ च्या सुमारास बोले पेट्रोल पंपाजवळ ही सिनेस्टाईल घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मृतकाचे नाव बाल्या बिनेकर असून त्याचे गोळीबार चौकात सावजी रेस्टॉरंट आहे. कुख्यात गुन्हेगार म्हणून बाल्याची ओळख होती. त्याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न, जुगार तसेच दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी वर्तुळात बाल्याचे अनेक शत्रू आहेत. बाल्या आज त्याच्या आलिशान कारने अमरावती मार्गाने जात असताना बुलेट तसेच एक्टिवावर आलेल्या चार ते पाच गुन्हेगारांनी त्याचा पाठलाग केला. बोले पेट्रोल पंपाजवळच्या सिग्नलवर कार थांबताच बाल्याला कारची काच खाली करण्यास भाग पाडले

अत्यंत वर्दळीच्या मार्गावर भर सिग्नलवर ही घटना घडली त्यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. आरोपी पळाल्यानंतर एकाने नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सीताबर्डी पोलिसांना ही माहिती कळविली.

https://youtu.be/JRB1tNDKZqc

त्यानंतर सीताबर्डीचा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनीही घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचे नाव स्पष्ट झाले नव्हते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत होते.