Published On : Sun, Feb 16th, 2020

गजानन महाराजांच्या भव्य रथयात्रेने रेशीमबाग परिसर दुमदुमला

स्थानिक रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही वंदनीय परमपूजनीय समर्थ सद्गगुरु श्री संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा प्रगटदिनोत्सवानिमित्य संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या भव्य रथयात्रेने संपुर्ण रेशीमबाग परिसर श्रद्धावंतांच्या जय गजानन च्या गजरात दुमदुमुन गेला . प्रगटदिनोत्सवानिमित्य आयोजीत श्रींच्या रथयात्रेचा शुभारंभ सकाळी ८ वाजता सुप्रसिद्ध होमीयोपॅथतज्ञ -नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष डाॅ विलासजी डांगरे यांचे शुभहस्ते करण्यात आला . याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, माजी आमदार सुधाकर कोहळे, नगरसेवक डॉ रवींद्र भोयर, श्रद्धास्थानचे संयोजक गिरीशजी वराडपांडे ,सौ शीतल प्रशांत कामडे ,दिव्यताई धुराडे, डाॅ श्रीरंग वराडपांडे , यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला .

रथयात्रेचा संपुर्ण परिसर महिला भाविकांनी सडे शिंपुन , रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्या काढुन तसेच फुलांच्या पुष्पवृष्टी करुन गजानन महाराजांच्या रथाचे घराघरातील सुवासिनींनी स्वागत केले . भाविकांनी श्रींच्या मुळ प्रतिमेला औक्षवाण व पुजन केले . रथयात्रेत सर्वप्रथम जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल चे लेझीम टीपरी पथक , नवरंग बॅंड पथक , उमरी – कारंजा येथील सती अनसूयामाता भजनी मंडळ, श्रीरंग संगीत विद्यामंदीरच्या विद्यार्थ्यांचं लेझीम पथक , संतोषीमाता भजनी मंडळ, लक्ष्मी भजन मंडळ, महाराजांचा गजर करणारे भाविक , तसेच समर्थ सद्गगुरु श्री संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा सजविण्यात आलेला भव्य रथ हे आकर्षणाचे मुख्य केंद्र होतं .

या पालखीत श्री गजानन जय गजानन , गण गण गणांत बोते , ओम गजानन नमो नम , गुरु गजानन माझे आई मजला ठाव द्यावा पायी , आदी मंत्रांच्या गजराने परीसर भक्तीमय झाला . रथयात्रेत हजारोंच्या संखेने भाविकवृंद उपस्थित होता .


या रथयात्रेसाठी , नरेंद्र गोरले , प्रकाश निमजे, बाळ भेंडे ,संजय रक्षिये, दीपक वाळके, , डाॅ मुकुंद पांडे , सतीशराव निफाडकर , नरेश ईटनकर, रमाकांत पेंडके , अरविंद पिट्टलवार आदित्य देव, मोहन रसेकर, जिनीत भिमटे, कुशल ठावकर, , , सीमा पेंडके , लताताई तेलंग, मंगला पोटे, ज्योती तितरमारे, भारती वाळके, ममता मानकर,चित्रा मानकर, आशु पोहणे, अलका तितरमारे, मंजू तितरमारे, जयश्री तितरमारे, गीता मौदेकर, गौरी रक्षिये, समृद्धी वराडपांडे ,वैजयंती अटळकर, प्रांजली देव, यांचे सहकार्य लाभले.प्रगटदिनानिमित्य दुपारी गजानन महाराजांना मंगल अभिषेक , मंगल आरती व महाप्रसाद वितरीत करण्यात आला .भाविकांनी संतकवी कमलासुत रचित गजानन अवतरणिका चे सामुहीक पठण करण्यात आले .

आज रविवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण तर सकाळी 10 वाजता स्व वंदनाताई वराडपांडे स्मृती अमृतधारा मातृशक्ती द्वारा आयोजित भजन स्पर्धेची महाअंतीम फेरी आयोजीत असुन बक्षीस वितरण केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते करण्यात येईल . संध्या ७ वाजता शिल्पा कानडे इंदोर यांचा शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे .