Published On : Sun, Feb 16th, 2020

संत सेवालाल महाराज यांना आदरांजली

नागपूर: संत सेवालाल महाराज यांना आज त्यांच्या जयंती निमित्य आदरांजली वाहण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, हरीश गजबे, नारायण आमझरे, अविनाश सहारे, उप महाव्यस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे,कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर,प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले,उप मुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे उपस्थित होते.