Published On : Mon, Apr 12th, 2021

ना. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे ‘मायलन इंडिया’चे 4 हजार इंजेक्शन नागपुरात

नागपूर: कोविडवरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढविण्यासाठी केंद्री मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन/व्हिटारिस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ना. गडकरी यांच्या
विनंतीवरून मायलन इंडियाने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत.

या इंजेक्शनची दुसरी खेप पाठविण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही रेमडेसीवीर इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. यापूर्वी ना. गडकरी यांनी ‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी बोलणे केले होते.

सन फार्मामार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोजेसचा पुरवठा नागपुरात झाला आहे आणि उर्वरित डोजेस लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे.