Published On : Tue, Sep 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गणेश मंडळांच्या मागणीला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद; ढोल-ताशा पथकांसाठी नोंदणी सुरू

Advertisement

नितीन गडकरींचा मोठा दावा; उच्चभ्रू भागांपेक्षा रेड-लाइटसह गुन्हेगारी भागातून परिसरात जास्त मतदान

नागपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांसाठी यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ढोल-ताशा वादन कार्यक्रमासाठी मंडळांची नोंदणी सुरू करण्याच्या सूचना खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीला दिल्या आहेत.

गणेश मंडळांनी ढोल-ताशा वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ८ आणि ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गडकरी वाडा, महाल येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन समितीने केले आहे. मात्र, ज्या मंडळांना यापूर्वीच सांस्कृतिक कार्यक्रमांचे वाटप करण्यात आले आहे, त्यांनी या नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Gold Rate
Sept 08,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,37,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून, या काळात शहरात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. गेल्या चार वर्षांपासून नागपुरात ‘सांस्कृतिक गणेशोत्सव’ उपक्रम राबविला जात आहे.

यंदा भक्तिसंगीत, सुगम संगीत, देशभक्तिपर गीते, हास्य कविसंमेलन, कीर्तन, गोंधळ, जागरण, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रयोग, नाट्यप्रयोग, गीत रामायण, जादूचे प्रयोग, रांगोळी व मेंदी प्रशिक्षण तसेच कथाकथन यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Advertisement

कला, साहित्य, संस्कृती आणि पारंपरिक कलांना प्रोत्साहन देतानाच गणेश मंडळांना सांस्कृतिक उपक्रमांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांची तयारी सुरू झाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.