Published On : Tue, Mar 17th, 2020

दिव्यांग प्रेरणा विशेषांकाचे गडकरींच्या हस्ते विमोचन

नागपूर: मुलांचे मासिक या प्रकाशन संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी विशेषत्वाने तयार केलेल्या दिव्यांग प्रेरणा विशेषांकाचे विमोचन नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या करण्यात आले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानीच हे विमोचन करण्यात आले.

याप्रसंगी अंध विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ऑडिओ सीडीचे विमोचनही करण्यात आले. ब्लाईंड रिलिफ असोसिएशनने ही सीडी तयार केली आहे.

अंध विद्यार्थी पाहून वाचू शकत नाही म्हणून दिव्यांग प्रेरणा विशेषांक हा गोष्टी रुपात ते ऐकू शकतात. दिव्यांगावर मात करून ज्यांनी संघर्ष केला आहे, अशांचा संघर्ष आणि दिव्यांगांच्या यशस्वी कथा या अंकात देण्यात आल्या आहेत. या प्रकाशन प्रसंगी मुलांचे मासिक प्रकाशन जयंत मोडक, नचिकेत प्रकाशनचे अनिल सांबरे, चार्टर्ड अकाऊंटंट अजित दामले, प्रकाश डोंगरे, मूकबधिर विद्यालयाचे समर्थ, अंध विद्यालयाचे शिरीष दारव्हेकर, सक्षमचे रामानंद केळकर, भरत महाशब्दे आदी उपस्थित होते.