Published On : Sat, Jul 3rd, 2021

नागपुरातील पिवळी नदीवरील मोठ्या पुलाचे गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर – राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नागपूरच्या वांजरा येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या केंद्रीय रस्ते निधीतून पिवळी नदी वरील मोठ्या पुलाचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी पालकमंत्री डॉ . नितीन राऊत , महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते .

हा पूल वांजरा बाजूच्या औद्योगिक क्षेत्राला जोडणारा मुख्य भाग असून नागपूरच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागात मुख्य रस्ता म्हणून काम करतो हा पूल विटाभट्टीची बाजू तसेच वांजरा बाजूच्या मुख्य क्षेत्राला जोडणारा मुख्य भाग असून हा पूल पिवळी नदी आणि चांबार नाल्याच्या संगमावर बांधलेला आहे.पुलाची लांबी 50 मीटर असून सुमारे 25 कोटी रुपये खर्च या पुलाच्या बांधकामासाठी करण्यात आला आहे .

Advertisement

Advertisement

पावसाळ्यात उत्तर नागपूरातील या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी पासून या पुलामुळे आता सुटका मिळणार असून यामूळे या भागातून शहराकडे जाणारे दळणवळण सोपे होणार आहे .

या लोकार्पण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते .

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement