Published On : Fri, Apr 23rd, 2021

गडकरींनी कोव्हिड रुग्णांसाठी मनपाला दिले २५ एन.आई.वी.

नागपूर : केन्द्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी कोरोना रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे २५ नॉन इन्वेसिव वेंटीलेटर (NIV) नागपूर महानगरपालिकेला गुरुवारी प्रदान केले.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी २५ एन.आई.वी. श्री. गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कोव्हिड रुग्णांसाठी सुपुर्द केले. सर्व एन.आई.वी. मनपाच्या रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारामध्ये वापरण्यात येतील असे महापौरांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर उपस्थित होते.