मालेवाडा जळीतकांड : पोलिसांचा संशय, तपास सुरु
पोलिसांच्या तपासातील प्रारंभिक निष्कर्ष
केवळ ठराविक कागदपत्राचीच जाळपोळ
गुन्हाची पद्धती अगदीच वेगळी, साहित्याची चोरी
गडचिरोली। कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात फ़ुर्निचर, कागदपत्रांची जाळपोळ व साहित्य चोरी प्रकरणात प्रारंभी माओवाद्यांचा सहभाग असल्याची बोंब उठली. मात्र आता या प्रकरणात माओवाद्यांचे नाव घेऊनही काही अज्ञात व्यक्तींनीच हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकाराने मालेवाडा जळीतकांडाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरु केला आहे.
गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत वडसा वनविभागाचे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा गावात वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. या कार्यालयात गुरुवारी पहाटेच्या सुमारास 10 ते 12 अज्ञात व्यक्तींनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चौकीदार आंदे हे कर्तव्यावर होते. त्यांचे हात व पाय बांधून चौकीदाराला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तेथील फ़ुर्निचर व महत्वाचे दस्तावेज कार्लायासमोर असलेल्या राष्ट्रध्वजाच्या चबुतरयाजवळ आणून जाळून टाकण्यात आले. काही फ़ुर्निचरीचीही जाळपोळ करण्यात आली. यावेळी 1 लाख 45 हजार 300 रुपये किमतचे एक संगणक व संच केमरे पळविले.
सन 2002 मध्ये याच कार्यालयात माववाध्यानीअशीच जाळपोळ केली होती. शिवाय सन 2008 मध्ये ग्राम पंचायतीला देखील माववाध्यानी जाळले होते. हा इतिहास लक्षात घेता या प्रकरणात माओवाद्यांचा सहभाग असल्याची बोंब उठली. मात्र मालेवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेवार यांच्या तक्रारीवरून मालेवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर या प्रकरणात कलाटणी मिळाली.
कार्यालयातील दस्तावेज जाळताना काही ठराविक कागदात्रांची जाळपोळ करयात आली. शिवाय गुन्हाची पद्धतही अगदीच वेगडीच असल्याचे दिसून आले. संगणक व केमेरा चोरी गेल्याने या प्रकरणात माववाग्यांचे नाव घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. सध्या वनविभागात सुरु असलेला बोंगड कारभार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार लक्षात घेता या प्रकरणात पुरावे नष्ट कण्यासाठी अज्ञात व्यक्तींना हि जाळपोळ केली असावी, अशीही एक शक्यता आहे.
देचलीपेठा प्रकरणावरही संशय
विशेष म्हणजे, अथ्वादाभारापुर्वी अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात देखील सिलींडरचा स्फोट घडवून अशीच जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणातही माओवाद्यांचे नाव पुढे आले. मात्र आता पोलिसांच्या तपासात भलतीच बाब पुढे आल्याने देचलीपेठा प्रकरणावरून संशय व्यक्त होत आहे.
