Published On : Wed, Oct 20th, 2021

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या कृषी समृध्दी योजने अंतर्गत सिताफळ लागवड व रोपे वाटप मेळावा संपन्न

गढ़चिरोली – गडचिरोली जिल्हयातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकरी हे पारंपारिक पिकपध्दतीचा वापर करीत असल्यामुळे भरघोस उत्पादन घेवु शकत नाही. गडचिरोली जिल्हयात सुपिक जमिन, पाण्याची उपलब्धता व नैसर्गिक संसाधने असतांना सुध्दा शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.

ही बाब विचारात घेवुन दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेवुन जाण्याकरिता व त्याचे जीवनमान उंचावण्याकरिता मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल साो. यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट कृषीसमृद्धी योजना राबविण्यात येत असुन, त्याअंतर्गत उपपोस्टे राजाराम (खां.) येथे 10,000 सिताफळ रोपांची रोपवाटीका तयार करण्यात आली होती. आज दिनांक 20/10/2021 रोजी उपपोस्टे राजाराम (खां.) येथे कृषी गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या समृध्दी योजनेअंतर्गत येथे सिताफळ लागवड प्रशिक्षण व रोपे वाटप मेळावा तसेच कोनशिला समारंभ पार पाडण्यात आला.

Advertisement

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे हस्ते उपपोस्टे राजाराम (खां.) चे नविन ईमारतीचे कोनशिलाचे अनावरण करुन प्रभारी अधिकारी पोउपनि.रविंद्र भोरे लिखित सिताफळ लागवड माहीती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या शेती विषयक अडीअडचणी समजुन घेवुन, कृषी विभागाच्या विविध योजना व कृषी तंत्रज्ञान याविषयी मा. डॉ. नवनाथ कसपटे प्रगतीशिल सिताफळ बागायतदार (बार्शी) सोलापूर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मा. पोलीस अधीक्षक सा. यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रत्येकी 25 याप्रमाणे 10,000 सिताफळ रोपे, गांडुळ खत व सिताफळ लागवडीबाबतच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 7 लाभार्थी, श्रावणबाळ योजने अंतर्गत 27 लाभार्थी, जॉबकार्ड 25 लाभार्थी, ड्रायविंग लाईसन्स 11, अधिवास प्रमाणपत्र 30, लाभार्थांना वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करतांना मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी पारंपारीक पीकाशिवाय इतर उत्पादन घेतांना दिसुन येत नाही, शेती हे केवळ उपजीवीकेचे साधन न राहता आर्थिक उत्पन्न वाढीचा स्त्रोत बनावा, यासाठी शेतकरी बांधवांना नविन पीक पध्दतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण तसेच रोपे वाटप करुन कृषी विषयक जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

यापुर्वी कृषी समृध्दी योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर उप पोस्टे पेरमिली मार्फत जिल्हाभरातील होतकरु व गरजु शेतकऱ्यांना 15,000 मोफत शेवगा रोपे वाटप करण्यात आले. व उपपोस्टे बामणी येथे 15,000 पपई रोपांची रोपवाटीका तयार करुन शेतक-यांना फळ झाडांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

एटापल्ली तालुक्यातील मौजा कोटमी व एटावाही या गावातील 42 महीला व भामरागड तालुक्यातील मौजा नारगुंडा, धोडराज, लाहेरी, भामरागड, होडरी, गुंडेनूर, ताडगाव या अतिदुर्गम भागातील 40 शेतक-यांसाठी कृषी दर्शन सहलिचे आयोजन करण्यात आले होते. या शेतक-यांनी महाराष्ट्रातील प्रगत शेतीचे तंत्रज्ञान जाणुन घेतले आहे.

यामुळे तुमचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे,असे मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले. सिताफळ लागवड कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा. मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी, श्री. अनुज तारे सा. यांचे विशेष योगदान लाभले.

या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी, श्री. अनुज तारे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी मा श्री. अमोल ठाकुर सा., तालुका कृषी अधिकारी अहेरी मा. श्री. संदेश खरात सा., प्रगतीशिल सिताफळ बागायतदार शेतकरी श्री. डॉ. नवनाथ कसपटे सोलापुर, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि. महादेव शेलार व अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा उपविभागातील 200 ते 250 शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी, मा श्री. अमोल ठाकुर सा., उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा, मा. श्री. राहुल गायकवाड सा., उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा, मा. श्री. प्रशांत स्वामी सा., उपपोस्टे राजाराम (खां.) चे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र भोरे, पोउपनि. विजय कोल्हे, पोउपनि. गणेश कड, पोउपनि. केशव केंद्रे, व अंमलदार उपपोस्टे राजाराम (खां.) यांनी अथक परीश्रम घेतले. – सतीश कुमार,गढ़चिरोली

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement