Published On : Thu, May 6th, 2021

राज्यमार्ग अधिका-यांच्या दुर्लक्षतेने नयाकुंड वळणा वर वारंवार अपघात

– नयाकुंड वळणावर कांद्याचा ट्रक पलटला,चालक व क्लीनर चा जिव वाचला

पारशिवनी (कन्हान) : – आमडी फाटा ते पारशिवनी दोन पदरी सिमेंट रस्त्यावरील पेंच नदी काठावर नयाकुंड गावाजवळील रस्त्यावर एल वळणावर सुचना फलक, गतिरोधक, रस्ता दुभाजक नसल्याने चालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन अपघाताचे प्रमाण वाढ ल्याने राज्यमार्ग अधिका-यांनी त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा चक्काजाम करण्याचा इसारा अनिकेत निबोंणे उपाध्यक्ष युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका हयानी निवेदन देऊन दिला आहे.

रामटेक, आमडी फाटा- पारशिवनी दोन पदरी सिमेंट राज्यमार्गावर वाहनाची चांगलीच वर्दळ असुन पेंच नदी काठावर असलेल्या नयाकुंड गावाला लागुनच हा रस्ता असुन एल वळण असुन एकीकडे दुकाने, घरे असल्याने लोकांची ये-जा सुरू असते. सिमेंट रस्ता बनल्यापासुन नयाकुंड गावाजवळ वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटुन अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघात जिवहानी व मालहानी होत आहे. असेच बुधवार (दि.५) ला सकाळी कांद्याचा ट्रक पलटला परंतु यात चालक व क्लीनर दोघेही थोडक्यात वाचले. अनिकेत निबोंणे हयानी पोलीसाना माहीती देऊन बोलाविले.

मुख्यअभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नागपुर हयाना निवेदन पाठवुन नयाकुंड गावाजवळील रस्त्यावरील एल वळणावर सुचना फलक, गतिरोधक, रस्ता दुभाजक नसल्याने चालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन अपघात होत असल्याने त्वरित योग्य उपाय योजना करून पेंच नदी पुलावर रात्रीला आंधार असल्याने हॉयमास लॉईट लावण्यात यावा. प्रशासनाने गंभीरतेने लक्ष न दिल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा ईशारा अनिकेत निबोंणे उपाध्यक्ष युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका हयानी दिला आहे.