Published On : Sun, Jul 31st, 2022

रक्त विकार तज्ज्ञांचे निःशुल्क समुपदेशन-मार्गदर्शन शिबिर रविवारी

Advertisement

– ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ उपक्रम’

विशिष्ट समुदायातील अनुवंशिक आजार समजल्या जाणाऱ्या लाखो सिकलसेल ग्रस्त रुग्णांना दररोज संघर्ष करून आपले जिवन हालअपेष्टा सहन करून आज जगावे लागत आहे. सिकलसेल आजारातील पीडित रूग्णांना योग्य समुपदेशन तसेच सविस्तर मार्गदर्शनपर माहिती मिळाली तर या आजाराची मुक्तता शक्य आहे. या हेतूने स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर तर्फे तसेच नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑरगानायजेशनच्या (नास्कोे) सहकार्याने सिकलसेल ग्रस्तांसाठी येत्या रविवारी 31 जुलै 2022 रोजी रक्त विकार तज्ज्ञांचे निःशुल्क समुपदेशन-मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित या शिबिराचे आयोजन जयवंत नगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, प्राचार्य अरूणराव कलोडे महाविद्यालयाजवळील स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मुख्यालयातील पहिल्या माळ्यावर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सपन्न होणार. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रख्यात वरिष्ठ हेमॅटोलाॅजीस्ट तसेच हेमटो ऑन्कोलाॅजी, अमेरिकन ऑन्कोलाॅजी इंस्टिट्यूट, नागपूरचे विभाग प्रमुख डाॅ. अवतार क्रिष्ण गंजू हे रुग्णांना सुनियोचित मार्गदर्शन करणार. शिबिराला मुख्य अतिथी म्हणून मेडिकलच्या माजी बालरोग प्रमुख डाॅ. दिप्ती जैन तर अध्यक्षस्थानी नागालॅंड पोलिस विभागाचे अतिरिक्त महासंचालक संदीप मधुकर तामगाडगे (भा. पो. से.) यांची उपस्थिीती राहणार. याप्रसंगी व्यासपीठावर स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे, नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑरगानायजेशनचे (नास्को) सचिव गौतम डोंगरे आणि ट्रस्टचे सल्लागार यशवंत बागडे आदी मान्यवर उपस्थिती राहणार. शिबिराची प्रस्तावना प्रिती नगराळे या करतील.

सिकलसेल ग्रस्तांना समुपदेशन तसेच मुबलक दरात औषधांबाबत जनजागृती व्हावी या समाजाभिमूख कार्याचा विडा स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या अभियानाद्वारे घेतला आहे. या अभियानात नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑरगानायजेशन (नास्को), इंडियन अंम्बेडकराईट डाॅक्टर फेडरेशन (आयएडीएफ), अम्बेंडकर अ‍ॅनालाईस्ट, पॅंथर पाव व मिशन टी ट्वेन्टी यांच्या सहकार्य लाभात आहे. रक्त विकार तज्ज्ञांचे निःशुल्क समुपदेशन-मार्गदर्शन शिबिरात शहरातील सिकलसेल ग्रस्त तसेच त्यांचे नातेवाईक, शेजारी, मित्र-मैत्रिणी यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.