Published On : Tue, Jul 6th, 2021

पोस्ट कोवीड़ रुग्णाकरिता निशुल्क शिबीर

Advertisement

लाँयन्स क्लब सानेर चा उपक्रम

सावनेरः संपूर्ण जगात कोवीड़ 19 ने हहाकार माचवला असुन प्रत्येक परीवारास याची झड लागली आहे. अनेकांना कोरोना विषाणूची लागन झाली असुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला.आज कोरोना जरी नियंत्रणात दिसत आहे परंतू तो केव्हा पलटवार करेल सांगता येत नाही.
कोरोना पासुन बचावाकरिता सावधानी व उपाययोजना ही आवश्यक आहे.

कोरोनाकात के पहिल्या व दुसर्सा चरणात जे कोरोना संक्रमित झाले,उपचार केला व बरे ही झाले अश्या रुग्णांना मधुमेह,स्वास लागने,फुफ्फुसात दुखने,,कमजोरी,शरीरात व छातीत दुखने सह अनेक समस्याना पुढे जावे लागत विशेषतः रुग्णांत एक सामन्य धारणा आहेकी त्यांना कोरोना झाला व आता ते स्वस्थ आहेत व ते आपल्या आरोग्याप्रती लापरवाह होत आहे वेळोवेळी आपले नियमित तपासणी टाळत आहेत हे अतीशय धोकादायक आहे.

*याकरीता लाँयन्स क्लब आँफ सावनेर द्वारे अश्याच पुर्व कोरोना संक्रमित रुग्णांच्या पुर्ण शारीरिक चाचणी करिता दि.9 जुलई 2021 ला आयएमए हाँल नागपुर रोड सावनेर येथे सकाळी 10 ते 2-00 असे “पुर्व कोरोना पीडित” रुग्णांना निशुल्क तपासणी शिबीरचे आयोजन केले आहे.

या शिबिरात मधुमेह,फुफ्फुसांचे विकार (PFT,s),इसीजी तसेच आवश्यकता भासल्यास एक्सरे सुविधा ही निशुल्क उपलब्ध करण्यात येणार असुन. शहरचे तज्ञ चिकित्सक डाँ.परेश झोपे,डॉ.शिवम पुण्यानी,डॉ.अमित बाहेती,डॉ.छत्रपती मानापुरे इत्यादी शिबीरार्थी रुग्णांची तपासणी करुण योग्य सल्ला देतील*

लाँयंन्स क्लब सावनेर व्दारे आयोजित सदर निशुल्क तपासणी शिबीराच्या यशस्वीते करिता लाँयन्स क्लब सावनेर चे अध्यक्ष अँड्.अभिषेक मुलमुले,सचिव प्रा.विलास डोईफोडे,कोषाध्यक्ष अँड् मनोज खंगारे,पुर्व अध्यक्ष वत्सल बांगरे,सदस्य पियुष जिंजुवाडीया परिश्रम घेत आहे.

सदर आयोजनाचा लाभ क्षेत्रतील सर्व पुर्व कोरोना ग्रसित नागरीकांनी घ्यावा अशी विनंती पत्र परिषदेतून सचिव विलास डोईफोडे,डॉ.अमित बाहेती व शिवम पुण्यानी यांनी केली असुन शिबीरात येते वेळी आपले ओळखपत्र व कोरोना दरम्यान केलेल्या उपचाराची माहीती सोबत आनन्याची विनंती केली आहे*
दिनेश दमाहे