Published On : Fri, Jun 18th, 2021

सूवर्णमोती जेम्स अन्ड ज्वेलर्स सराफा व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

नागपूर – सूवर्ण लक्ष्मी योजना आणि सूवर्ण सार्थक योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून अनेकांची एका सराफाने अनेकांची रोकड हडपली. जितेंद्र तिवारी असे आरोपी सराफाचे नाव असून त्याचे ईतवारीच्या सराफा बाजारात सूवर्णमोती जेम्स अन्ड ज्वेलर्स नावाने दुकान होते. वर्षभरापूर्वी दुकानाला टाळे लावून तो गायब झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.

२ जानेवारी २०१९ ला तिवारीने सुवर्ण लक्ष्मी योजना आणि सुवर्ण सार्थक योजना सुरू करून गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले. वर्षभर या योजनांत अनेकांनी हजारोंची रक्कम गुंतवली. १२ जानेवारी २०२० ला योजनेचा अवधी पूर्ण झाल्यामुळे गुंतवणूकदार दासारामलखराम पंचभूते (वय ७२), स्नेहल कापसे त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याने रक्कम परत करण्यासाठी वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळले. मार्च २०२० मध्ये त्याने दुकानाला टाळे लावले अन् बेपत्ता झाला. फोनवर तो गुंतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची बनवाबनवी उघड झाल्याने पंचभूते तसेच कापसे यांनी तहसील ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सराफा जितेंद्र तिवारी याचा पोलीस शोध घेत आहेत.

Advertisement

अनेकांना गंडा, तक्रारदार वाढणार

तिवारीने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तक्रारदार पोलिसांकडे पोहचतील, असा अंदाज आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement