Published On : Fri, Mar 22nd, 2019

नागपूरचे चार भाविक ठार

वाशीम/नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात होऊन नागपूरचे चार भाविक ठार झाले. मंगरुळनाथ तालुक्यातील गऱ्हाळाजवळील मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवेवर बुधवारी हा भीषण अपघात झाला.

मुस्कान शे. सलीम खान (२३), शे. वहिदा शे. गुलामनबी (४०), शे. सलीम खान अब्दुल कासम (५०) रा. मोठा नागपूरचे चार भाविक ठार ताजबाग नागपूर हे जागीच ठार झाले. तर वहिदा खातुन उर्फ राणी महफुजखान (४०) यांचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाला. अलिया शे. इम्रान (०६), शे. हरीश शे. इम्रान (०७), शे. वाजिया परदरीन शे. इमाण (२६), अलबिरा शे. इमरान (०४) यांना उपचारासाठी वाशीम येथे हलविण्यात आले.

त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोल्यावरून नागपूरला हलविण्यात आले आहे. चालक शे. इम्रान किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्व नागपूरवरून कारने सैलानीला दर्शनासाठी जात होते.