Published On : Mon, May 21st, 2018

आयपीएल क्रिकेट सट्टाप्रकरणी चार जणांना अटक

Cricket Betting

Representational Pic

कन्हान: आयपीएल क्रिकेटवर बेटिंग करण्याप्रकरणी चार व्यक्तींना गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान पोलिसांच्या मदतीने अटक केली. कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत वराडा शिवारातील फाॅर्म हाऊसवर सनराईज हैदराबाद विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या सामन्यावर बेटिंग सुरू होती.

या बेटिंगची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान पोलिसांच्या मदतीने या फाॅर्म हाऊसवर शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान धाड टाकली.

Advertisement

यात बेटिंग करताना शैलेश गोविंद केळवदकर, प्रगेश सुभाष मेश्राम, सुभाष केळवदकर व राजा बोकडे सर्व राहणार बिनाकी मंगळवारी नागपूर यांना अटक केली. या आरोपींकडून २८०० रुपये नगद व इतर साहित्य असा एक लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

Advertisement

या प्रकरणी कन्हान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आगाशे करीत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement