Published On : Mon, Jul 13th, 2020

वाळू तस्करी करणारे चार आरोपी जेरबंद

रामटेक पोलिसांची कारवाई,२ ट्रक सह 40 लाखाचा मुद्देमाल जप्त,महसूल विभाग चे दुर्लक्ष,लाखो रुपयाचा महसुल पान्यात

रामटेक: मागील काही दिवसांपासून नागपूर ग्रामीण पोलिस परिक्षेत्रातील विविध यांच्यात सुरू असलेल्या कारवाईने वाळूतस्कर यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे अशातच रामटेक. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीला वाळू तस्करी करणाऱ्या 2 ट्रक चालक व मालकांवर कारवाई करून चव्हाण जेरबंद केले. यात ट्रक सह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी रामरतन जीवन वर्मा (32) रा भुवनेश्वर, ईश्वर खेळू वर्मा (32) रा भुवनेश्वर, विकास दयाराम पांडे वय (24) रा बेसा व दीपक तेजराम मानापुरे (42) रा मानापुर रोड या चौघांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री 12:40 वाजताच्या दरम्यान रामटेक परिसरात उपरोक्त आरोपी हे त्यांच्या एमएच- 40 के 2438 व 40 बी.जी 2172 क्रमांकाच्या ट्रक मध्ये 12 हजार रुपये किमतीची बास रेतीची वाहतूक करताना मिळून आले चारही आरोपींच्या ताब्यातून 40 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या आदेशानवये उपविभागिय पुलिस अधिकारी नयन आलूरकर ,पोलिस निरीक्षक दीलिप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर, शिपाई गोविंद खांडेकर, राजू भोयर, राजू पोले, शब्बीर शेख यांनी केली.

पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की माननीय गृह मंत्री यांच्या आदेशा नुसार “आमची पेट्रोलिंग हाय वे आणि तुमसर रोड तसेच मनसर येथे पेट्रोलिंग सुरू असते.

जर का कोणत्या ही गाडी कडे रॉयल्टी नसेल तर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्यात येते , किव्वा जर त्यांच्या कडे रॉयल्टी असेल पण ते संदिग्ध असेल तर ते तहसील कार्यालय मार्फत तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येते व पुढेही केली जाईल.

रेतिघाटाचे रक्षण आणि अवैध विना रॉयल्टी रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मान्सून विभागा ला सोपवली आहे. या रेतीची कोणत्या मार्गाने वाहतूक केली जाते तसेच अशा पद्धतीने उचल केली जाते. इत्यंभूत माहिती महसूल भागातील अधिकाऱ्यांना आहे. मात्र तालुक्याच्या कोणीही प्रभावी कारवाई करण्याच्या भरीस पडत नसल्याने महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह झाले आहे.