Published On : Mon, Sep 9th, 2019

कामठीतील सतीश धामती खून प्रकरणातील मुख्य चार आरोपीना अटक

कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्याचे हद्दीतील जुनी ओलो दिवाण मंदिर परिसरात काल झालेल्या सतीश धामती खून प्रकरणातील मुख्य चार आरोपीना डीबी पथकातील पोलिसांनी अटक केल्याची कारवाई आज दुपारी चार वाजता सुमारास केली असून अटक चार आरोपी मध्ये सन्नी संजय चव्हाण व 21 राहणार कोळसा टाल, लोकेश हेमराज वांदिले वय 19 राहणार पेरकीपुरा, अमन समीर पुरोहित वय 18 राहणार लाला ओळी, अमित सुनील यादव वय 21 राहणार कादर झेंडा कामठी असे आहे.

अटक या चारही आरोपीं नि सदर घटनास्थळी काल 7 सप्टेबर ला सकाळी साडे सहा वाजता तोंडाला कापड बांधून मोटारसायकलवरून येऊन सतीश च्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून पळून गेले , आरोपी सन्नी चव्हाण,व लोकेश वंदिले हे दोघेही मोटारसायकलने कामठी वरून गुमथळा येथे आरोपी लोकेश च्या आजीच्या घरी लपून असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलीस ठाण्यातील ज्ञानचंद दुबे डीपी पथकातीला गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी आज रविवारला दुपारी 2 वाजता सापळा रचून आरोपी सनी चव्हाण व लोकेश वांदिले यांना अटक करून नवीन कामठी पोलिस ठाण्यात आणले दोन्ही आरोपींना सतीश धामती च्या खुनाबद्दल विचारपूस केली असता त्यांनी खून केल्याचे कबुली पोलिसांना दिली दोन्ही आरोपींना जुनी कामठी पोलिसांनी ताब्यात घेतले

दुसरे आरोपी अमन समीर पुरोहित, अमित सुनील यादव हे दोघेही आज रविवारला दुपारी 4 वाजता सुमारास कामठी रेल्वे स्टेशनवरून मध्यप्रदेश कडे पळून जात असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी देवीदास कठाळे यांना मिळाली असता त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून दोनीही आरोपीस अटक करून जुनी कामठी पोलीस स्टेशन ला आणून चौकशी केली असता त्यांनीही सतिशचा खून केल्याचे कबूल केले आहे खुणातील चारही मुख्य आरोपीना अटक करण्यात आली असून चारही आरोपीना जुन्या भाडणावरून खून केल्याचे कबूल केले आहे पुढील तपास जुनी कामठी पोलीस करीत आहेत वरील कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक पोलिस आयुक्त राजरतन बन्सोड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार देविदास कठाळे, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, दुय्यम पोलीस निरीक्षक राधेशाम पाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक युनूस शेख, उपनिरीक्षक विनोद धोंगडे कॉन्स्टेबल प्रमोद वाघ मंगेश गिरी वेद प्रकाश यादव ललित शेंडे, किशोर मालोकर, कीशोर गांजरे, अलोक रावत, विवेक श्रीपाद, विजय सिन्हा, पवन गजभिये आदींनी केली असून आरोपी कडून खुनात वापरलेले शस्त्र, मोटार सायकल जप्त करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱयांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी