Published On : Sat, Nov 24th, 2018

भाजपा जिल्हा मंत्री मुंगले ला मारहाण करण्यारे चार आरोपी अटक

Advertisement

कन्हान पोलीसांनी मिळाला आरोपीचा दोन दिवस पी सी आर.

कन्हान : – पोकलेंड मशीनच्या भागीदारीच्या व्यवहारातुन उदभवलेल्या वादात भाजपा जिल्हामंत्री व रामटेक चे आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी यांचे सहकारी श्री जिवन महादेव मुंगले यांना कांद्री येथे जबर मारहाण करून जिवे मारण्याचा पर्यंत करण्यारे चार आरोपी तबल महिन्याभरा नंतर अटक करण्यात आले असून न्यायालयात सादर करून कन्हान पोलीसांना दोन दिवसाचा पी सी आर मिळाला आहे .

Gold Rate
17 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900/-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 2,01,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शुक्रवारी (दि. १९) ऑक्टोबर ला दुपारी २ वाजता कांद्री येथे एका हॉटेल मध्ये पोकलेंड मशीनच्या भागीदारीच्या व्यवहारा बाबत बैठक बोलावली. त्या मध्ये त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातुनच जिवन मुंगले यांना प्लास्टिक पाईप, नाऱळ व लाताभुक्यानी बिकेश सिंग व बबलु ओमरे , व सहका-यांनी जबर मारहाण केली आणि गलिबत झालेल्या मुंगले ला कार मध्ये टाकुन नागपुर कडे नेण्यात आले .

तिकडे ही जबर मारहाण करून माऊझर कनपटा ला लावुन काहीतरी लिहुन घेतले . उपलवाडी जवळ सोडुन आरोपी पसार झाले . कोणीतरी एका व्यक्तीने एका ऑटोत बसवुन कन्हान पोलील स्टेशन पर्यंत रात्री ८.३० वाजता दरम्यान पाठवले . जिवन मुंगले यांनी कसीतरी आप बिती सागतल्यावर कन्हान पोलीसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्यावर डॉक्टरांनी तुरंत मेयो दवाखान्यात पाठविले . प्रकृती चिंताजनक असल्याने दहा दिवस उपचार करण्यात आला.

कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या बयाना वरून आरोपी बी के सिंग, बबलु ओमरे व अन्य सहकार्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला . या दरम्यान आरोपी ने १२ नोव्हेंबर पर्यंत एंटीसेफ्टीक बेल मिळविला . फिर्यादी , पोलीस , सरकारी वकिलांनी आरोपी च्या वकीलासी युक्तिवाद करत आरोपी ची बेल पुढे रद्द केली. यास्तव आरोपी बुधवार ला कन्हान पोलीस स्टेशनला येऊन जमा झाले .

कन्हान पोलीसांनी कलम २९४, ३२६, ३६३, ३४ भादंवि व आरम अॅक्ट ३, २५ , मुपोको १३५ नुसार अटक करून गुरुवार (दि.२२) ला न्यायालयात हजर केले असता आरोपी १) नितिन ऊर्फ बबलु रमेश ओमरे वय ४२ वर्ष रा. शिवनगर कन्हान, २) बिकेश पुनित सिंह वय २६ वर्ष रा. हरिहर नगर कांद्री कन्हान, ३) गुरमित मोहनसिंग रोधी वय ३२ वर्ष रा कांद्री,४) अश्वनी शारदाप्रसाद तिवारी वय ३६ वर्ष रा दुर्गा नगर कांद्री या चारही आरोपी चा कन्हान पोलीसाना दोन दिवसाचा पी सी आर देण्यात आला आहे .

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement