Published On : Wed, Jan 29th, 2020

आगामी आर्थिक वर्षासाठी 57 कोटी 66 लाखांची वाढ – अर्थमंत्री

Advertisement

– नागपूर जिल्हयाच्या तीनशे कोटींच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी

नागपूर: नागपूर जिल्ह्यासाठी 2020-2021 या आर्थिक वर्षात 299 कोटी 52 लाख रुपयांच्या नियोजन आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मंजुरी दिली. शासनाने 241 कोटी 86 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करून दिली होती.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अर्थमंत्र्यांनी आजच्या बैठकीत 57 कोटी 66 लाख रुपये अतिरिक्त वाढ मंजूर केली. शेतक-यांसाठी कर्जमुक्ती योजनेला प्राधान्य देणार असल्याचे श्री. पवार म्हणाले. विभागीय आयुक्त कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, आमदार प्रकाश गजभिये, समीर मेघे, विकास ठाकरे यांच्यासह वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलींद नारींगे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने 25 वाहनांसाठी साडेतीन कोटी निधीची आवश्यकता असल्याचे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले. तर अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे अर्थमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

Advertisement

नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. त्यामुळे येथील विकासकामे बाधीत होणार नाही. अतिरिक्त निधीच्या बाबतीत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहमतीने योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही अर्थमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges