Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा गांधीनगर येथील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘धीरजगड’ या किल्ल्याचे कौतुक होत आहे.
वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेत दरवर्षी दिवाळीनिमित्त किल्ल्याचे निर्माण करण्यात येते. लान्सर्स क्लब आणि शिव वैभव किल्ले स्पर्धेत या किल्ल्याला सहभागी करण्यात येते. दरवर्षी या किल्ल्याला क्रमांक प्राप्त होतो.
सेवानिवृत्त शिक्षक श्री. गुजर आणि कला शिक्षक श्री. पंडित यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा किल्ला बनविला आहे. शाळा सन २००६ पासून स्पर्धेत सहभागी होत आहे. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या मेडपल्लीवार आणि रजनी परिहार, श्री. वैरागडे आदी शिक्षकांचे यामध्ये सहकार्य प्राप्त झाले.
Advertisement