Published On : Mon, Nov 19th, 2018

माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जयंती म.न.पा.त साजरी

Advertisement

नागपूर: देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्या-या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे “राष्ट्रीय एकात्माता” दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. म.न.पा.सिव्हील कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगरीच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार व उपमहापौर श्री.

दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती श्री.विरेन्द्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे, म.न.पा.आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्व.इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली दिली तसेच उपस्थित अधिकारी/कर्मचा-यांना महापौर नंदा जिचकार यांनी “राष्ट्रीय एकात्मतेची शपथ” दिली.

Gold Rate
24 July 2025
Gold 24 KT 99,500 /-
Gold 22 KT 92,500 /-
Silver/Kg 1,15,500 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी जलप्रदाय समिती सभापती श्री.विजय (पिन्टू) झलके, नगरसेवक श्री. किशोर जिचकार व संजय हिरणवार, अति.आयुक्त श्री. रवींद्र ठाकरे, अति.आयुक्त श्री. अझीझ शेख , उपायुक्त डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिवाजी जगताप, निगम सचिव श्री. हरिश दुबे, सहा.

आयुक्त (सा.प्र.वि.) श्री. महेश धामेचा व मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता (विकास) श्रीमती सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री. एस.बी.जैस्वाल, राजेश भुतकर, एम.जी.कुकरेजा, प्रदीप राजगीरे, मनोज गणवीर, राजेंद्र राहाटे, कर निर्धारक व संग्राहक श्री. डी.एम.उमरेडकर, प्रमुख अग्निशमक अधिकारी राजेन्द्र उचके, शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या मेडपल्लीवार, अविनाश बारहाते, आर.एस.कांबळे, ग्रंथालय अधिक्षक श्रीमती अल्का गावंडे, बाजार अधिक्षक श्रीकांत वैद्य यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व अधिकारी/कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जनसंपर्क अधिकारी श्री.अशोक कोल्हटकर यांनी केले.

Advertisement
Advertisement