Advertisement
पुणे: राज्याचे माजी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरू आहेत.नवाब मलिक यांना नेमका काय त्रास होत आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली होती. अटकेत असताना नवाब मलिक यांची प्रकृती खालावली होती आणि प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला होता.
मुंबईतील कुर्ला परिसरातील जमिनीच्या व्यवहार प्रकरणात झालेल्या गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीने अटक केली.