Published On : Fri, Dec 14th, 2018

माजी मुख्यसचिव अरुण बोंगीरवार यांचं निधन

Advertisement

राज्याचे माजी मुख्यसचिव अरुण बोंगीरवार यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगी दिप्ती,गार्गी आणि मुलगा पियूष असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होत.

अरुण बोंगीरवार हे मुळचे विदर्भातील अरुण बोंगीरवार हे मुळचे विदर्भातील यवतमाळमधले होते. ते १९६६ च्या आयएएस बॅचचे अधिकारी होते. प्रशासनात विविध पदांवर काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटवितानाच १९९९ मध्ये राज्याचे २५ वे मुख्यसचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांनी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या दोन वेगवेगळ्या मुख्यमंत्र्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते. त्यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त म्हणून पुण्यातील पार्वती झोपडपट्टीधारकांना विस्थापित न करता पुनर्वसन प्रकल्प राबविला होता.

त्यांनी घालून दिलेलं पुनर्वसनाचं हे अनोखं मॉडल आजही देशपातळीवर राबविलं जात आहे. त्यांनी उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोकण आदी ठिकाणी विविध पदांवर काम केलं आहे. त्यांच्या निधनामुळे कर्तृत्वान अधिकारी हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सकाळी दहा ते साडे बाराच्या दरम्यान मंत्रालयाजवळील ‘मूनलाईट’, ओव्हल मैदानाच्या समोर, या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement