Published On : Tue, Dec 17th, 2019

महापौरांच्या इशा-यानंतर वन विभागाकडून शुल्क माफीचा निर्णय

Advertisement

जपानी उद्यानात सकाळी ६ ते ९ या वेळेत शुल्क न घेण्याची मागणी मान्य

नागपूर : सेमीनरी हिल्स येथील जपानी उद्यानामध्ये सकाळी फिरायला जाणा-या नागरिकांकडून शुल्क घेण्यात येत असल्याने सकाळच्या शुल्क माफीसंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी नुकतेच उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांना निवेदन दिले होते. सकाळी फिरायला जाणा-यांची शुल्क माफ न केल्यास मुख्यमंत्री निवासापुढे ‘गांधीगिरी’ करण्याचा इशाराही महापौरांनी दिला होता. महापौर संदीप जोशी यांच्या इशा-यानंतर वन विभागाकडून शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जपानी उद्यानात फिरायला जाणा-यांकडून सकाळी ६ ते ९ या वेळेत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Advertisement

जपानी उद्यानामध्ये सकाळी फिरायला येणा-यांकडून शुल्क घेण्यात येउ नये अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी (ता.१३) महापौर संदीप जोशी यांनी उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांना दिले होते. शहरातील कोणत्याही उद्यानांमध्ये किमान नउ वाजतापर्यंत सकाळी फिरायला येणा-यांकडून शुल्क घेतले जात नाही. मात्र जपानी उद्यानामध्ये दररोज नागरिकांकडून शुल्क घेण्यात येते. जपानी उद्यान मनपाच्या अखत्यारित नसून वन विभागाच्या अखत्यारित आहे.

त्यामुळे उद्यानात फिरायला येणा-यांकडून शुल्क न घेण्याबाबत महापौरांनी उपवनसंरक्षक संरक्षकांशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. जपानी उद्यानात येणा-यांकडून येत्या १८ डिसेंबरपर्यंत शुल्क घेणे बंद न करण्यात आल्यास २० डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या ‘रामगिरी’ या निवासस्थानापुढे नागरिकांसह गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला होता. वन विभागाने महापौरांसह नागरिकांची मागणी मान्य केल्याने महापौरांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement