Published On : Mon, Mar 2nd, 2020

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भंडारा येथे राईस मिलला भेट

Advertisement

भंडारा :- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज धान खरेदी केंद्र व राईस मिलला भेट देऊन धान उत्पादक शेतकरी व मिलरच्या समस्या जाणून घेतल्या. धान खरेदी केंद्रावर येणारे सर्व धान खरेदी केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

आज खराबी आणि सौंदड येथील राईस मिलला छगन भुजबळ यांनी भेट देऊन मिलींगची पाहणी केली.यावेळी उपस्थित शेतकरी आणि मिलर यांनी श्री.भुजबळ यांना धान शेती आणि राईस मिलिंगबाबत माहिती दिली.यावेळी आ राजू कारेमोरे आणि आ मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बनसोड, जिल्हा पणन अधिकारी खाडे यावेळी उपस्थित होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी भुजबळ म्हणाले की, सर्वसाधारण धानाला १८१५ रुपये आणि उच्चप्रतीच्या धानाला १८३५ रुपये दर होता. गेल्या कित्येक वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांची बोनसची आणि दरवाढीची मागणी होती. महाविकास आघाडी सरकारने धानाला ५०० रुपये बोनस जाहीर केला. त्या पाठोपाठ नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आणखी २०० रुपयांची दरवाढ देण्यात आली. त्यामुळे धानाचे भाव जवळपास २५३५ रुपयांच्या घरात पोहचले आहे. याचा धान उप्तादक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांमधील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी भंडारा येथे ही प्रातिनिधिक भेट दिल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे धान वाहतुकीची परवानगी ५०० किलोमीटर वरून ८०० किलोमीटर करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कोकण विभाग सोडून राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचा वाहतुकीमध्ये समावेश करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

शिवभोजन केंद्रास भेट
मंत्री छगन भुजबळ यांनी भंडारा महसूल कॅन्टीन येथील शिवभोजन केंद्रास भेट दिली व पाहणी केली. शिवभोजनाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. शिवभोजन योजनेच्या जेवणाचा दर्जा उत्तम असल्याची प्रतिक्रिया यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केली. स्वच्छता राखा, फलक दर्शनी भागात लावा, जेवणाचा दर्जा उत्तम ठेवा अशा सूचना भुजबळ यांनी केल्या. शिवभोजनामुळे गरजू व गरीब जनता समाधानी असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.

Advertisement
Advertisement