Published On : Mon, Nov 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खंडणीच्या धमकीपत्रांनंतर सराफा बाजारातील व्यापाऱ्यांना पोलिसांकडून सुरक्षेची हमी; DCP मदने यांच्यासोबत बैठक!

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, पोलिसांकडून गस्त आणि बंदोबस्त वाढवण्याचे आश्वासन
Advertisement

नागपुरात खंडणीच्या धमकीपत्रांनंतर सराफा बाजारातील व्यापाऱ्यांना पोलिसांकडून सुरक्षेची हमी; DCP मदने यांच्यासोबत बैठक!

नागपूर : इतवारी सराफा बाजारातील व्यापाऱ्यांना कथित लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकीची पत्रे मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सराफा व्यापाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. पोलिसांनी व्यापाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देत बाजारपेठेत कडक बंदोबस्त ठेवण्याचे आश्वासन दिले.

बैठकीदरम्यान व्यापाऱ्यांनी धमकीपत्रांमुळे निर्माण झालेली भीती आणि संभाव्य धोके पोलिसांसमोर मांडले. बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या दुकानांसह त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरही सुरक्षा वाढविण्याची मागणी करण्यात आली. यावर DCP राहुल मदने यांनी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इतवारी सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांची गस्त वाढविणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, 8 ते 10 व्यापाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची खंडणी मागणारी पत्रे मिळाल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. धमकीपत्रे पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासोबतच व्यापाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून, आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.