Advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अभिवादन केले आणि कामगार व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.