Published On : Sun, May 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र दिनी मनपा आयुक्त व प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने रविवारी (१ मे) नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील हिरवळीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रारंभी मनपा आयुक्त यांच्या ‘तपस्या’ या शासकीय निवासस्थानावर आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी ध्वजारोहण केले. यानंतर मनपाच्या राजशिष्टाचारानुसार त्यांना अग्निशमन विभागाच्या पथकाद्वारे मनपा मुख्यालयात आणण्यात आले. मनपा मुख्यालयात ध्वजारोहणानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाची मानवंदना मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी स्वीकारली.

Gold Rate
Mar 12 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,900/-
Gold 22 KT ₹ 1,49,600 /-
Silver/Kg ₹ 2,65,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, उपायुक्त (महसूल) श्री. मिलींद मेश्राम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक आयुक्त किरण बगडे, सहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे, वै‌द्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता श्री. अविनाश बारहाते, कार्यकारी अभियंता श्री. अजय मानकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी भिमराव चंदनखेडे, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सुरूवातीला मनपा आयुक्त व प्रशासकांसह मान्यवरांनी अग्निशमन विभागाच्या परेडचे निरीक्षण केले. अग्निशमन विभागाच्या दोन प्लाटूनने यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना आणि अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांना मानवंदना दिली. अग्निशमन विभागाच्या पहिल्या प्लाटूनचे नेतृत्व श्री. अनिल गोळे यांनी केले तर दुसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व श्री. बी.बी. वाघ यांनी केले.

शिक्षण विभागाचे कलसिया आणि त्यांच्या चमूने राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभारही मानले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement