Published On : Mon, Jul 6th, 2020

पाच रुपयाच्या शिवभोजन थाळीची 10 रुपयात विक्री

Advertisement

शासन निर्णयाची सर्रास पायामल्ली

कामठी :-राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेले शिवभोजन आहार हे गरिबांच्या भुकेचा आधार बनला आहे.लॉकडाउन संपला असला तरी असामान्य परिस्थिती असल्यामुळे राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी , मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी आणखी तीन महिने म्हणजे सप्टेंबर महिन्यात पर्यंत पाच रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे या निर्णयाला मंत्रीमंडळात मान्यता सुद्धा दिली आहे .

या निर्णयाने कोरोनाच्या पाश्वरभूमीवर निर्माण झालेली परिस्थितीत गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणारा आहे मात्र कामठी शहरात सुरू असलेल्या दोन शिवभोजन थाळी केंद्रातुन 5 रुपयात सवलत दरात मिळणारी शिवभोजन थाळी ही 10 रुपयात विकून शासन निर्णयाची सर्रास पायमल्ली करीत आहेत तसेच या शासन निर्णयाबाबत वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीवरून पाच रूपयात मिळनारो थाळी ही 10 रुपयात कसे विकता?याबाबत जागरूक लाभार्थ्यांनी विचारपूस केले असता त्याच्याशी शिवभोजन केंद्र कडून असभ्य पनाची वर्तणूक करून ‘तुंमको जो उखाडणा है वो उखाडलो ‘ अशा शब्दाचा वापर करून शिवभोजन थाळी मिळाल्याची उरमी दाखवून देतात तेव्हा गरिबांच्या जेवणावर डल्ला मारणाऱ्या व लाभार्थ्यांशी अभद्र व अपमानास्पद वर्तणूक करणाऱ्या या प्रकारावर संबंधित अधिकाऱ्यानि लक्ष पुरविणे गरजेचे आहे .

कोरोना विषाणूचा प्रदूर्भावा मुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपया मध्ये गरजुना जेवण देण्याचा मुख्यमंत्री उद्धव यांनी महत्वकांक्षी निर्णय मार्च मध्ये घेण्यात आला होता .हा सवलतीचा दर 30 जूनपर्यंत लागू करण्यात आला होता मात्र या कोरोना च्या महामारी संकटात अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा दर सप्टेंबर पर्यंत लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे मात्र कामठी शहरातील शिवभोजन थाळी केंद्राकडून या शासन निर्णयाची सर्रास पायमल्ली करोत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वकांक्षी संकल्पनेला गालबोट लावण्याचे काम सदर शिवभोजन थाळी केंद्राकडून करण्यात येत आहे.

शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यासाठी तहसील प्रशासनाकडे 9 संस्थांनी अर्ज सादर केले होते त्यातील दोन संस्थांना शिवथाळी भोजन केंद्र मंजूर करीत 1 जून पासून केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली ज्यामध्ये संस्थाचालक विनोद दिपाणी तसेच जिजाबाई महिला बचत गट चा समावेश आहे. या शिवभोजन थाळी केंद्राना राजकीय आश्रय असल्या मुळे संबंधित तहसिल प्रशासनाची कुठलीही भीती दिसून येत नाही हे इथं विशेष!

संदीप कांबळे कामठी