Published On : Wed, Jan 1st, 2020

मनपाचे ३७ अधिकारी व कर्मचारी सेवेतून निवृत्त

नागपूर– नागपूर महानगरपालिकेचे ३७ अधिकारी व कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम मंगळवारी (ता.३१) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला.

यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, निगम अधीक्षक मदन सुभेदार यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक अधीक्षक नितीन साकोरे, , मनोज कर्णिक, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, डोमाजी भडंग, दिलीप तांदळे प्रामुख्याने उपस्थित होते.

सेवानिवृत्त झालेल्यामध्ये अभियंता व्ही.बी.पराते, आर.डी.बुरनासे, पी.बी.भोयर, ए.पी.बावनकर, एस.ए.कुरेशी, प्रदीप पवार, एस.एम.गायकवाड, अशोक टेंभुर्णे, सिद्धार्थ गायकवाड, शिवाजी कैकाडे, रंजन एन्प्रेंडीवार, ए.एल.लव्हारे, डी.जे.थेटे, शकुंतला लोणारे, मो.नईमुल्लाह सलीम अंसारी, मल्लीक शाहदा मन्नान राजीक मनिराम मुल, खजिस्ता जबिन अ खान, दामोदर वडे, गंगाधर भुजाडे, खुशाल कराडे, संजय झाडे, सुरेंद्र चंहादे, राजाराम मलेवार, विजय गजभिये, हरिश गहलोद, नंदा तांबेकर, मिरा जूगेल, पद्मावती सावरकर, शांताबाई खोब्रागडे, तारा डेलीकर, रामा मेश्राम, मन्नु ससावरकर, केवल बोरकर, रामप्यारी कैथेल यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. कार्यक्रमाला केशव कोठे, किशोर तिडके, विनय नानोटकर, सिताराम डाहळकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.