Published On : Thu, May 6th, 2021

बेला भागात साडेपाचशे रुग्ण !

Advertisement

स्थानिक प्रशासन उदासीन विलगीकरण कक्ष ‘निरुपयोगी’

बेला: कोरोनाला लगाम लावण्याची ज्यांचे वर मदार आहे. ते बेला येथील स्थानिक प्रशासन बेफिकीर व उदासीन आहे असा आरोप आता सुज्ञ जनता करू लागली आहे. कारण येथील रुग्ण संख्येचा आलेख वाढत चालला असून बेला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सद्यस्थितीत कोरोनाचे सक्रिय संक्रमित रुग्णांनी साडे पाचशेचा पल्ला ओलांडला आहे. त्याशिवाय धास्ती मुळे असंख्य अदृश्य रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. साडे 500 पैकी शंभरावर रूग्ण घरीच विलगीकरण मध्ये आहेत. भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात संक्रमित रुग्ण भरती होत नसल्याने ते निरुपयोगी धूळ खात पडले आहे.

कोरोना हद्दपार करण्यासाठी येथे आपत्ती व्यवस्थापन समिती आहे .त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच सुनंदा उकण्डे सून आरोग्य अधिकारी ,ठाणेदार ,तलाठी, ग्रामसेवक व इतर लोकप्रतिनिधी ,पुढाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र कोरोना बाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सरपंचांना आहेत. समिती व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यांच्यात समन्वय व एकसूत्रीपणा नाही तसेच जिवघेण्या कोरणा बाबत गांभीर्य दिसून येत नाही.त्यामुळे या भागात काही केल्या रुग्ण संख्या कमी होत नाही..असा ग्रामस्थांचा आरोप आहे. लॉक डाऊन सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी, रस्ते , चौक व बाजारपेठेत सरपंचांनी अधिकाऱ्यां सह एकदा सुद्धा भेट दिली नाही .असे नागरिकांनी सांगितले.


भाजीपाल्याचा तुटवडा : ग्राहकांची धावपळ
वाहतुकीची कोंडी होत असल्याने मुख्य रस्त्यावर भाजीपाला विकण्यास विक्रेत्यांना पोलिसांनी मनाई केली त्यांना भाजी बाजारासाठी मोकळी जागा मुक्रर करून देण्यात आली .पण तेथे जाण्यास ते तयार नाही.या वादात ग्राहकांना भाजीपाला मिळणे दुरापास्त व मुश्कील झाले आहे.पोलीस गर्दी करणा रे व रिकाम टेकड्यांवर कारवाई न करता आम्हाला हाकलून लावतात व धंदा करून पोट भरणाऱ्या लहान गरीब विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करतात.असा भाजीविक्रेत्यांचे आरोप आहे. मात्र भाजीपाला मिळवण्याचे धावपळीत येथे गर्दी होत आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद असताना व शासकीय प्रतिबंध असतानासुद्धा येथे सट्टापट्टी व दारूचे धंदे कसे सुरु आहेत ? तसेच बस स्टैंड वर एक सायकल ,मोटर सायकल दुरुस्तीचे दुकान निर्बंध असतानाही कसे सुरु आहे ? असा प्रश्न भाजीपाला विक्रेत्यांनी उपस्‍थित केला आहे.

प्रतिक्रिया: एका किराणा व औषधी दुकानात गर्दी होते तेथे सैनी टायझर फवारणी व हात धुण्यासाठी साबण व पाण्याची बकेट सुद्धा ठेवण्यात येत नाही. अशी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली नाही. तो पुढारी व सरपंचाचा विश्वासू असल्याने कारवाई करण्यात येत नाही. बेला पोलिसांनी गावाबाहेर रस्त्यावर वसुली करण्यापेक्षा गावातच लक्ष द्यावे.अन्यथा कोरोना हाता बाहेर जाईल.