नवी दिल्ली: काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ३९ उमेदवारांच्या नावाची घोषणा काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ, सिक्किम आणि लक्षद्वीप इत्यादी राज्यांच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली.
राहुल गांधी यांना वायनाड मतदारसंघातून उमेदवारी – राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. तर राजनांदगाव मतदारसंघातून भूपेश बघेल रिंगणात असतील. महासमुंद मतदारसंघातून ताम्रध्वज साहू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.तसेच कोरबा मतदारसंघातून ज्योत्स्ना महंत, कर्नाटक (बेंगळुरू ग्रामीण) मतदारसंघातून डीके सुरेश यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.काँग्रेसच्या पहिल्या यादीत शशी थरुर यांच्या नावाचादेखील समावेश आहे.
शशी थरुर यांना तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर डी के शिवकुमार यांना बंगळुरु ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांना अलाफूजा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.