Published On : Mon, May 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अग्निशमन केंद्राचा मार्ग मोकळा; अतिक्रमणधारकांचे अपील न्यायालयाने फेटाळले

नगरविकास आणि सार्वजनिक हितासाठी मनपाची कारवाई योग्य; जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Advertisement

नागपूर: लकडगंज येथील नवीन अग्निशमन केंद्राच्या (Fire Station) पुनर्विकासासाठी नागपूर महानगरपालिकेने बजावलेली निष्कासन नोटीस आणि त्याविरोधात करण्यात आलेले अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहे. सार्वजनिक हितासाठी जागा रिकामी करण्याचा मनपाचा अधिकार न्यायालयाने मान्य केल्याने आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

लकडगंज येथील ‘कडबी तनास पडाव’ भागातील ५८५१.५४ चौरस मीटर जागा अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित आहे. या जागेवर १९७० पासून व्यवसाय करणाऱ्या एका भाडेकरूने (अपीलकर्ते ए. के. पारेख) मनपाच्या निष्कासन नोटिसीला न्यायालयात आव्हान दिले होते. अपीलकर्त्याचा दावा होता की, त्यांचे दुकान नियोजित बांधकामाच्या क्षेत्राबाहेर आहे आणि मनपाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करून ही कारवाई केली आहे.

Gold Rate
June 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,800 /-
Gold 22 KT ₹ 1,33,400 /-
Silver/Kg ₹ 2,24,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्हा न्यायाधीश श्री एम. एस. गणोरकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर स्पष्ट केले की, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सुसज्ज अग्निशमन केंद्र ही शहराची गरज आहे. केवळ मुख्य इमारतच नव्हे, तर अग्निशमन बंब (Fire Tenders) वळवण्यासाठी आणि पार्किंगसाठी संपूर्ण आरक्षित जागेची मनपाला आवश्यकता आहे. मनपाने अपीलकर्त्याला सुनावणीची योग्य संधी दिली असून, प्रशासकीय आदेशात कोणतीही बेकायदेशीरता आढळलेली नाही. वर्ष २०१४ पासून संबंधित जागेच्या लीजचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेवर कायमस्वरूपी हक्क सांगता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

मनपाच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता श्री. एस.के. मिश्रा आणि ॲड. ए. एम. क्वाझी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मंजूर विकास आराखड्यानुसार ही जागा आरक्षित असून, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडथळे दूर करणे आवश्यक आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत ३० जानेवारी २०२६ रोजीचा मनपा उपायुक्तांचा आदेश कायम ठेवला आहे. या साठी मनपाचे विधी अधिकारी श्री सूरज पारोचे व सहायक विधी अधिकारी श्री आनंद शेंडे यांनी प्रयत्न केले.

Advertisement

या निकालामुळे सार्वजनिक प्रकल्पांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांना चपराक बसली असून, लकडगंज परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या केंद्राचे काम आता वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime #accusedarrested #newsupdate #news

नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...

मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ फरार #nagpurnews #crime #stolen #mobile #news

मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate  #maharashtranews #maharashtra #top #top10

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...

नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews

नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews

नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate #Crime #LatestNews

नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges