मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18 वर सोलापूर एक्सप्रेसच्या रिकामी डब्याला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या उभ्या असलेल्या यार्डात सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्यानं फलाटावरील प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.
—More Details Awaited
Advertisement

Advertisement
Advertisement