Advertisement
नागपूर : सदर भागातील अंजुमन कॉम्प्लेक्सच्या बबू प्लाझा हॉटेलच्या तळघरात असलेल्या किचनमध्ये आग लागल्याची घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
माहितीनुसार, गुरुवारी रात्री 7.30 च्या सुमारास दुकानाला आग लागल्या फोन आला.
सिव्हिल लाइन्स स्टेशनच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या घटनेत ६० ते ७० हजाराचे नुकसान झाल्याची माहिती आहे.