नागपूर : नंदनवन गुरुदेव नगर परिसरातील व्यंकटेश एनक्लेव्ह बिल्डिंगमधील एका दुकानाला २४ जुलै २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग दिल्ली चाय कल्चर या दुकानात लागली असून, आगीत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती निमजे यांनी दिली. त्यांनी पहाटे २.५५ वाजता कोत्तवाली अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन केंद्र येथून MH-31-PS-4921 क्रमांकाची गाडी अवघ्या ५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली.
घटनास्थळी उपअधिकारी . तिळगुडे, चालक चव्हाण, प्रवेशक अहीरवार यांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत आग आटोक्यात आणली. लोकश शिंदे हे दुकानाचे भाडेकरू असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानात अॅपल लॅपटॉप, डीप फ्रीजर, ओव्हन ग्रिलर, इंडक्शन कुकर, वायरिंग, इलेक्ट्रॉनिक चिल्लर सामान जळून खाक झाले. अंदाजे १० हजार रुपयांचे साहित्य बचावण्यात आले.
आग लागण्यामागचे प्राथमिक कारण अबाधित विद्युत पुरवठा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची नोंद कोतवाली पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली आहे.अग्निशमन विभागाच्या बी. बी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आग सकाळी ४.४५ वाजता पूर्णपणे आटोक्यात आणली. स्थानिक नागरिकांनीही या वेळी तत्परता दाखवत मदत केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.