Published On : Fri, Sep 11th, 2020

मास्क न लावणा-या ५१६ नागरिकांकडून दंड वसूली

Advertisement

आठ दिवसात ३४९९ विरुध्द कारवाई

नागपूर : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल रु २००/- दंड आकारण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (११ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ५१६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लक्ष ०३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील आठ दिवसात शोध पथकांनी ३४९९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ६,९९,८००/- चा दंड वसूल केला आहे.


लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५९, धरमपेठ झोन अंतर्गत १०६, हनुमाननगर झोन अंतर्गत ४०, धंतोली झोन अंतर्गत ४९, नेहरुनगर झोन अंतर्गत ४१, गांधीबाग झोन अंतर्गत ३५, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ३०, लकडगंज झोन अंतर्गत ३५, आशीनगर झोन अंतर्गत ४२, मंगळवारी झोन अंतर्गत ७५ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आतापर्यंत आठ दिवसात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २६४, धरमपेठ झोन अंतर्गत ८४१, हनुमाननगर झोन अंतर्गत २६८, धंतोली झोन अंतर्गत ३७१, नेहरुनगर झोन अंतर्गत २२१, गांधीबाग झोन अंतर्गत २४३, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २११, लकडगंज झोन अंतर्गत २१७, आशीनगर झोन अंतर्गत ३३५, मंगळवारी झोन अंतर्गत ४९४ आणि मनपा मुख्यालयात ३४ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.