Published On : Tue, Sep 15th, 2020

मास्क न लावणा-या १६४ नागरिकांकडून दंड वसूली

Advertisement

आठ दिवसात ५६३४ विरुध्द कारवाई

नागपूर : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल रु ५००/- दंड आकारण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (१५ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १६४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ५६३४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ११,७६,०००/- चा दंड वसूल केला आहे.

Advertisement

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २०, धरमपेठ झोन अंतर्गत ३५, हनुमाननगर झोन अंतर्गत १७, धंतोली झोन अंतर्गत ७, नेहरुनगर झोन अंतर्गत १९, गांधीबाग झोन अंतर्गत १६, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १०, लकडगंज झोन अंतर्गत १६, आशीनगर झोन अंतर्गत ०५, मंगळवारी झोन अंतर्गत १८ आणि मनपा मुख्यालयात १ जणांविरुध्द मंगळवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५७५, धरमपेठ झोन अंतर्गत ११६६, हनुमाननगर झोन अंतर्गत ५२४, धंतोली झोन अंतर्गत ६३८, नेहरुनगर झोन अंतर्गत ३३८, गांधीबाग झोन अंतर्गत ३५५, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ३४५, लकडगंज झोन अंतर्गत ३३९, आशीनगर झोन अंतर्गत ६२३, मंगळवारी झोन अंतर्गत ६८९ आणि मनपा मुख्यालयात ४२ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.