सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ११० बेड्स उपलब्ध : महापौर व आयुक्तांचा पुढाकार

नागपूर : कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी मनपाद्वारे आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. सौम्य आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना आवश्यक ते उपचार वेळेवर मिळाल्यास शहरातील मृत्यूदर कमी करता येईल. यादृष्टीने महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या पुढाकाराने मनपाचे गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय आता यापुढे ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर’म्हणून कार्यान्वित असेल. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता रुग्णालयात ११० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व बेड्सना ऑक्सिजनचीही व्यवस्था आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या दोन्ही रुग्णालयांमधील ताण कमी करण्यासाठी व नव्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी इंदिरा गांधी रुग्णालय ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर’ सहाय्यक ठरत आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले व धोक्याबाहेर आलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना इंदिरा गांधी रुग्णालय ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर’मध्ये हलविण्यात येते. येथे त्यांच्यावर पुढील उपचार केले जात आहेत. आजघडीला इंदिरा गांधी रुग्णालयात ५० पुरूष व ३० महिला अशा एकूण ८० रुग्णांवर रुग्णालय प्रभारी डॉ.कांचन किंमतकर यांच्या नेतृत्वात उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह, आयुष मंत्रालयाचे १२ डॉक्टर आणि इतर वैद्यकीय चमू सेवा देत आहे.
मनपाद्वारे इंदिरा गांधी रुग्णालयाचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आल्यामुळे येथील रुग्णांना उत्तम सेवा प्रदान करण्यात येत आहे. रुग्णांना आवश्यक त्या प्रकारच्या उत्तम भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. इंदिरा गांधी रुग्णालयातील दुस-या व तिस-या माळ्यावर ७ वार्डमध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुढील काही दिवसात मनपाच्या इतरही रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांसाठी अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनपाद्वारे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही कोव्हिडचा धोका लक्षात घेउन जबाबदारीची वागणूक ठेवावी. कोणतिही लक्षणे आढळल्यास त्वरीत आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रात जाउन चाचणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करून घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी केले आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




